ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
साळशी येथील इनामदार श्री. देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानाचा पारंपारिक शिमगोत्सव संपन्न.

साळशी येथील इनामदार श्री. देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानाचा पारंपारिक शिमगोत्सव संपन्न.

प्रकाशन: 31 Mar 2024 05:51 PM
वाचन संख्या 332

शिरगांव | संतोष साळसकर : चौ-याऐंशी खेड्याचा अधिपती व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानाचा शिमगोत्सव पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे साजरा करण्यात आला. गावकोळणीचा लग्नसोहळा आणि धूळ मारण्याच्या कार्यक्रमाने गुरुवारी रात्री या उत्सवाची सांगता झाली.

पाच दिवस चाललेल्या शिमगोत्सवाची फाल्गुन पौर्णिमेपासून सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात प्रथम श्री वशिक तळखंबा मंदिरासमोर तसेच इनामदार श्री.पावणाई देवालयासमोर गाव होळी आंब्याच्या झाडाची घातली जाते. गावहोळीची ब्राह्मणाकरवी पुजा- अर्चा करून नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यानंतर इतर ठिकाणच्या होळ्या उभ्या केल्या गेल्या.

या उत्सवात होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी होळी उत्सवाबाबत होळदेवाकडे कौलप्रसादाने मान्यता घेऊन गावची रखवाली घेतल त्यानंतर कौल- प्रसादास सुरुवात करुन येणा-या लोकांच्या अडीअडचणी सोडविल्या जातात. दररोज रात्री होळीच्या ठिकाणी शिंपी समाजबांधवाच्या वतीने गावकोळीण सजवून तेथे एखादा वग म्हटल्यानंतर मंदिरात तमाशाचा कार्यक्रम होतो. दिवसाच्पावेळी गावात घरोघरी कोळीण फिरते. होळीच्या पाचव्या दिवशी सकाळी निशाण व तळीचे होळदेवाकडे पूजन करून ढोल ताशांच्या गजरात मानक-याच्या घरी निशाण आणी तळी नेतात. त्यानंतर गावात घरोघरी हे निशाण फिरविले जाते. तसेच रात्री शिंपी समाजबांधवांच्या वतीने इनामदार श्री. पावणाई मंदिराच्या सभागृहात गण, गवळण आणि गावकोळणीचा रंगतदार लग्नसोहळा झाल्यानंतर रात्री १२ वाजल्यानंतर धूळ मारुन या उत्सवाची सांगता झाली. पुढील चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला होळी तोडली जाते. यावेळी होळीच्या आंब्ये-यात बांधलेला नारळ वाढवून त्याचा प्रसाद उपस्थितांना वाटप करण्यात आला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स