वायरी भूतनाथ येथे श्री सत्यनारायणाची महापूजा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर लगतच्या वायरी भूतनाथ येथील निशाणकाठी महापुरुष येथे उद्या १ एप्रिल २०२४ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजीत करण्यात आली आहे. दुपारी १२ ते ३ महाप्रसाद, संध्याकाळी ७ वाजता संगीत भजन ( बुवा श्री भालचंद्र केळुसकर, सिंधुरत्न संगीत विशारद), रात्री ९ वाजता कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा ट्रिकसिन्ससहीत दशावतारी नाट्यप्रयोग ‘व्यंकटेश पद्मावती’ सादर होईल. या कार्यक्रमांना उपस्थित रहायचे आवाहन न्यू उभाटकर निशाणकाठी महापुरुष मित्रमंडळ वायरी भूतनाथ यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)