नाधवडे (गांवठण)येथील सौ.सुलभा नारकर कालवश.
नाधवडे परिसरांतील दत्तभक्तांची ‘मोठी आई’ गेल्याच्या भावनेचा परिसरात व्यक्त होतोय शोक..!
कणकवली | उमेश परब : वैभववाडी तालुक्यातील धवडे (गांवठण) येथील ज्येष्ठ रहिवासी सौ.सुलभा नारकर यांचे अल्पश: आजाराने निधन
वैभववाडी तालुक्यातील नाधवडे (गांवठण) येथील रहिवासी व सात्विक दत्तभक्त अशी त्यांची ओळख होती. नाधवडे येथील औदुंबर सेवा ट्रस्टचे संस्थापक प्रभाकर नारकर यांच्या त्या पत्नी होत. औदुंबर सेवा ट्रस्ट च्या कार्यात तसेच तेथील दत्त मंदिराच्या भक्ती कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते . येथील परिसरात तसेच दत्तभक्तांमध्ये त्या “मोठी आई ” या नावाने परिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, विवाहित दोन मुलगे, विवाहित तीन मुली जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 79 वर्षे होते .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)