ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कोरोना काळात आरोग्य, पोलिस, महसूल कर्मचारी व शिक्षकांनी केलेल्या कामाचा वैभव नाईक यांनी केले मनस्वी कौतुक..!

कोरोना काळात आरोग्य, पोलिस, महसूल कर्मचारी व शिक्षकांनी केलेल्या कामाचा वैभव नाईक यांनी केले मनस्वी कौतुक..!

प्रकाशन: 17 Oct 2021 01:45 PM
वाचन संख्या 112

शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या आयोजनातून कोविड योद्ध्यांचा सत्कार….!

कणकवली | उमेश परब : कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सवामध्ये शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या सौजन्याने व आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते कणकवली येथील कोविड योद्धयांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार आर.जे पवार, आरोग्य विभागाच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पि एम.शिकलगार, सहाय्यक तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत बुचडे, कणकवली पोलीस स्टेशन यांच्यावतीने पोलीस कॉन्स्टेबल कैलास इंपाळ, डॉ.सुहास पावसकर, डॉ.किशोरी कदम, डॉ.मनुजा भोसले, डॉ.डेनिस नाडार यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच कोविड काळात सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी, शिक्षक आदींनी उल्लेखनीय कर्तव्यदक्ष कामगीरी केल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक व युवानेते संदेश पारकर यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल शिवसेना पक्षाने घेऊन सन्मान केल्याबद्दल कोविड योद्धयांनी देखील आभार व्यक्त केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, विधानसभा संघटक सचिन सावंत, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, उपतालुकाप्रमुख राजु राणे, अनिल हळदिवे, सौरभ पारकर, रामु विखाळे, वागदे उपसरपंच रुपेश आमडोस्कर, ललित घाडीगांवकर, विलास गुडेकर, भालचंद्र दळवी, संजय पारकर, ए.पी.सावंत, अजित काणेकर, प्रतीक साटम, पराग म्हापसेकर, महिला आघाडीच्या प्रतिक्षा साटम, साक्षी आमडोसकर, कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर, शोभा बागवे, संजना कोलते, दिव्या साळगावकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अँड.हर्षद गावडे तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळू मेस्त्री यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स