ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
समस्त शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्ष वाढीचे काम करायचे आमदार वैभव नाईक यांचे आवाहन.

समस्त शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्ष वाढीचे काम करायचे आमदार वैभव नाईक यांचे आवाहन.

प्रकाशन: 17 Oct 2021 01:41 PM
वाचन संख्या 143

मालवण शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक उत्साहात संपन्न

मालवण |वैभव माणगांवकर : शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारा पक्ष आहे.पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपली एकजुट दाखवून गावागावांत शिवसेनेची संघटना अधिक भक्कम केली पाहिजे. विभागवार, गावागावात बैठका घेतल्या पाहिजेत. शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकास कामे जनतेपर्यत पोहचवली पाहिजेत. पदाधिकारी कार्यकर्त्याने लोकांमध्ये राहून त्यांच्या समस्या अडचणी सोडविण्यावर भर दिला पाहिजे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पक्ष वाढीचे काम करावे.असे आवाहन आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केले आहे. मालवण शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक काल शनिवारी जानकी मंगल कार्यालय मालवण येथे आमदार वैभव नाईक,माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. वैभव नाईक बोलत

याप्रसंगी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, महिला आघाडीच्या पूनम चव्हाण, नितीन वाळके, बाळ महाभोज, भाई कासवकर, भाऊ परब, बाबी जोगी, सौ. शिंदे, कमलाकर गावडे, निधी मुणगेकर, श्वेता सावंत, सेजल परब, समीर हडकर, यांसह मालवण तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य नगरसेवक, सरपंच,उपसरपंच, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख,संघटक, ग्रामपंचायत सदस्य, शाखा प्रमुख उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स