ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गसाठी २० हजार कोविड लसीचा पुरवठा

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गसाठी २० हजार कोविड लसीचा पुरवठा

प्रकाशन: 05 Aug 2021 01:32 PM
वाचन संख्या 62

आमदार वैभव नाईक यांची माहिती

कणकवली | प्रतिनिधी : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ज्यादा कोविड लसी पुरविण्याची मागणी दोन दिवसांपूर्वी पत्राद्वारे केली होती.या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाचे सचिव रामा स्वामी यांना सिंधुदुर्गसाठी ज्यादा लसींचा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोविशिल्ड च्या १७ हजार व कोवॅक्सीन च्या ३ हजार असे एकूण २० हजार लसीचे डोस आज उपलब्ध झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यापूर्वी दरवेळी सुमारे चार हजार कोविड लसींचा पुरवठा केला जात होता. त्यामुळे नागरिकांना कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी लसींची कमतरता भासत होती.यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांचा गोंधळ उडत होता.याकडे आ.वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे लक्ष वेधले होते.त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना दुसऱ्या डोस साठी कोविशिल्ड च्या १७ हजार व कोवॅक्सीन च्या ३ हजार असे एकूण २० हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स