कळसुली गावात एसटी बस सुरू करा; कणकवली आगार व्यवस्थापक निवेदन
भाजपा सोशल मीडिया शक्ती केंद्र प्रमुख रुजाय फर्नांडिस यांची मागणी
कणकवली / उमेश परब –
कळसुली हळवल,शिरवल एसटी बस सायंकाळी ६ नंतर चालू करण्यात यावी.तिन्ही गावातील लोक कामावर जात असतात, संध्याकाळी बस नसल्याने १२ते १३किलोमीटर घरी चालत जावं लागतं आहे.सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बस चालू झाली तर तिन्ही गावातील लोकांना फायदा होईल. सर्व सामान्य लोकांना रिक्षा भाड परवडत नाही,म्हणून संध्याकाळी ५.०० किंवा ६.०० वाजण्याच्या सुमारास बस सुरू करावी अशी मागणी भाजपा सोशल मीडिया शक्ती केंद्र प्रमुख रुजाय फर्नांडिस यांनी कणकवली आगार व्यवस्थापकला केली आहे .
यावेळीसामाजिक कार्यकर्ते मिलिंद सावंत,नयन दळवी सह कळसुलीतील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)