ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची घेतली कुडाळात भेट..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची घेतली कुडाळात भेट..!

प्रकाशन: 21 Mar 2024 11:43 AM
वाचन संख्या 261

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची २० मार्चला कुडाळ येथे भेट घेत एक दीर्घ लेखी निवेदन दिले. या निवेदनामध्ये नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी मालवण नगरपरिषदेच्या प्रशासकीय कारभाराबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असून त्याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या स्तरावर आवश्यक ती माहिती घेऊन त्यानुसार कार्यवाही करावी असे निवेदन दिले आहे.

नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक ही जबाबदारी एकाच व्यक्तिकडे असल्याने मालवण शहरातील विकासाचे, कचरा व्यवस्थापन व स्ट्रीट लाईट सारख्या घटकांकडे गेल्या वर्षभरात अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. स्वच्छतेविषयी नियोजनाचा अभाव, वापराविना असलेले बायोटाॅयलेटस, सक्शन गाडीचे अयोग्य नियोजन व बंद झालेली डास फवारणी, पार्किंग व्यवस्था, चुकीच्या पद्धतीने लागलेल्या दिशादर्शक फलकांमुळे पर्यटनाला बसणारा फटका, फोवकांडा पिंपळ येथील फाऊंटनची दुरावस्था, भाजी मार्केट व मामा वरेरकर नाट्यगृह येथील मल्टीपर्पज हाॅलचे थांबलेले काम तसेच अग्निशमन इमारत व मालवण न प आवार येथील संथ गतीने होत असलेले सुशोभिकरणाचे काम, मच्छि मार्केट येथील गाळ्यांची न झालेली लिलाव प्रक्रिया असे मुद्दे नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समोर तक्रार स्वरुपात ठेवले असून यापूर्वी याबाबात मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्याकडे वारंवार याबाबत पाठपुरावा केला असूनही त्याबाबत ठोस समाधान होत नसल्याचे नमूद केले आहे. या सर्व परिस्थिती मुळे मालवण नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगत निधी उपलब्ध करुन देऊनही जर काम होत नसेल तर विकासाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासल्यासारखे होत असल्याची खंत महेश कांदळगांवकर यांनी व्यक्त केला आहे.

मालवण नगरपरिषदेतील नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व सहकारी लोकप्रतिनिधी यांचा कार्यकाल संपल्यानंतर विकास कामांना ब्रेक लागल्याचे सांगत नगरपरिषदेच्या निवडणुका न झाल्याने जनता आजही, विविध कामांसाठी लोकप्रतिनिधींकडूनच अपेक्षा करणार आणि ती आपली नैतिक जबाबदारी आहे महेश कांदळगांवकर यांनी नमूद केले आहे. परंतु कामे न झाल्यास सुद्वा लोकप्रतिनिधीनींनाच जबाबदार धरणार असल्याचे सांगत महेश कांदळगांवकर यांनी प्रशासनाकडे सर्व मुद्द्यांबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला असूनही कार्यवाही न झाल्याची तक्रार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.

नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कुडाळ येथे भेट घेतली त्यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा बॅन्क उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, आमदार राजन तेली, मालवण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक गणेश कुशे उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स