ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
कणकवलीत स्वच्छता मोहीम ; जेष्ठ पत्रकार काका करंबेळकर यांनी केले मार्गदर्शन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कणकवलीत स्वच्छता मोहीम ; जेष्ठ पत्रकार काका करंबेळकर यांनी केले मार्गदर्शन.

प्रकाशन: 18 Mar 2024 03:46 PM
वाचन संख्या 102

कणकवली | ब्यूरो न्यूज : माऊली मित्र मंडळ कणकवलीच्या वतीने १७ मार्चला कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसराची स्वच्छता मोहीम संपन्न झाली. माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या मोहिमेला माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक तथा काका करंबेळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वैयक्तिक, सामाजिक आरोग्य आणि स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. यंत्रणांमध्ये स्वच्छता दूतांची संख्या आणि सध्या निर्माण होणारा कचरा यांच्या प्रमाणात प्रचंड तफावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी यंत्रणांमधील वरीष्ठांनी सामाजिक कार्यकर्ते व मंडळांना विविध मोहिमेत मार्गदर्शन करावे असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, सुभाष गोविंद उबाळे, सी.आर चव्हाण, निलेश निखार्गे, नामदेव मोडक, भगवान कासले, अविनाश गावडे, प्रशांत पाताडे,प्रभाकर कदम, उदय मालप प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.पंकज पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्याधर हनुमंते ,परिसेविका प्रिया कदम, औषध निर्माता प्रीती कोरगावकर ,कक्षसेवक सचिन तांबे, अमित परब,आदि उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे यांच्या संकल्पनेतून आम्ही ही स्वच्छता मोहीम आरोग्य विभागाच्या ठिकाणी राबवली. आमची स्वच्छता मोहीम होती.ती श्री.तावडे याच्या संकल्पनेतून जिल्हा आरोग्य केंद्राच्या परिसरात राबवली आणि आज कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली ती जिल्यातील ही मोहिम आहे. अशीच स्वच्छता मोहीम जेवढी आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी राबविणार असल्याचा मानस आहे. डाॅ. हनुमंते यांनी माऊली मित्र मंडळाच्या वतीने आज सकाळपासून ४ तास कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरातील स्वच्छता केली त्याबद्दल आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स