जि. के. मार्ग स्कूलच्या माजी विद्यार्थिनी वंदना जाधव कालवश.
शिरगांव | संतोष साळसकर : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील रहिवाशी वंदना तुकाराम जाधव ( वय – ५३ ) यांचे गुरुवार १४ मार्चला मुंबई येथील नालासोपारा येथे उपचारा दरम्याने अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, दोन मुली, दोन मुलगे, दोन भाऊ, एक बहिण, असा परिवार आहे. मुंबई येथील गणपतराव कदम मार्ग सेकंडरी स्कूल च्या त्या माजी विद्यार्थिनी होत्या. त्यांच्या या अकाली निधनाबद्दल त्यांच्या मित्र – मैत्रिणी परिवारात शोककळा पसरली आहे. त्या जि. के. मार्ग ( गणपतराव कदम मार्ग) स्कूल मुंबईच्या माजी विद्यार्थीनी होत्या. गणपतराव कदम मार्ग स्कूल मधील त्यांच्या समकालीन मित्र मैत्रिणींनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)