ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हळवल फाट्यावर इनोव्हा कंटेनर चा अपघात..!

हळवल फाट्यावर इनोव्हा कंटेनर चा अपघात..!

प्रकाशन: 17 Oct 2021 01:16 PM
वाचन संख्या 63

अपघातात सात जण जखमी….!

कणकवली |‍ उमेश परब : कोल्हापूरहून गोव्याला जात असलेली इनोव्हा व गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेला कंटेनर ही दोन्ही वाहने परस्परांना धडकली. महामार्गावरील येथील गडनदी पुलानजीकच्या वळणावर रविवारी सकाळी ९ वा. सुमारास झालेल्या या अपघातात इनोव्हामधील सातही प्रवासी जखमी झाले. गडनदी पुलानजीक चौपदरीकरणाचे काम अर्धवट स्थितीत आहे. परिणामी तेथे वाहने एकाच लेनवर येतात. त्याच कारणास्तव हा अपघात घडला. सुदैवाने इनोव्हामधील एअरबॅग उघडल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात कार्तिक अशोक खोत (१२), दत्तात्रय आनंदा खोत (४०), बाबुराव शामराव खाटकर (५३), चैतन्य दत्तात्रय खोत (१२), चेताली दत्तात्रय खोत (१४), मनिषा दत्तात्रय खोत (३३, सर्व रा. बाजार भोगावती, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), चालक प्रदीप दिगंबर पोवार (३४, करवीर- कोल्हापूर) हे जखमी झाले. अपघातानंतर नागरीक, महामार्ग विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स