साळशी येथे विकास कामांचे भूमिपूजन.
शिरगांव | संतोष साळसकर : खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून साळशी – बौध्दवाडी रस्त्याचे खडीकरण व डाबंरीकरण करणे यासाठी ८ लाख रुपये मंजूर आहेत. तसेच जनसुविधा योजनेंतर्गत साळशी – धनगरवाडी रस्त्याचे खडीकरण व डाबंरीकरण करणे.यासाठी ५ लाख रुपये मंजूर आहेत. या दोन्ही कामाचे भूमिपुजन नुकतैच संपन्न झाले.
यावेळी सरपंच वैशाली सुतार, ग्रामपंचायत सदस्य विशाखा साळसकर, कविता साळसकर, वैभव साळसकर, माजी सरपंच किशोर साळसकर, माजी उपसरपंच विक्रांत नाईक, म. गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रभाकर साळसकर, विजय सुतार, विजयकुमार लाड, रुपेश गावकर, रवि गावकर, महेंद्र साळसकर, सिताराम साळसकर, विश्वास साळसकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोन्ही विकास कामांमुळे ग्रामस्थांत समाधान व्यक्त केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)