ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ आयोजित जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातला पहिला नृत्य सन्मान पुरस्कार सोहळा ; २९ मार्चला कुडाळ येथे आयोजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ आयोजित जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातला पहिला नृत्य सन्मान पुरस्कार सोहळा ; २९ मार्चला कुडाळ येथे आयोजन.

प्रकाशन: 15 Mar 2024 07:13 AM
वाचन संख्या 76

कुडाळ | प्रतिनिधी : शासनमान्य संस्था ‘चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ’ आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातला पहिला ‘नृत्य सन्मान’ हा पुरस्कार सोहळा शुक्रवारी २९ मार्चला रोजी सायंकाळी ५;३० वाजता मराठा समाज हॉल कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ नृत्य कलाकार, नृत्य दिग्दर्शक, नामांकित नृत्य कलाकार, नृत्य कार्यक्रम निवेदक, रंगमंच व्यवस्था प्रमुख तसेच नृत्य कार्यक्रम आयोजन प्रमुख या सर्वांना ‘नृत्य सन्मान’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सोबत नृत्यविष्कार, भव्य रंगमंच, विद्युत रोषणाई सादरीकरण अनुभवता येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पहिलाच नृत्य क्षेत्राशी निगडित पुरस्कार सोहळा असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कलाकार एकाच रंगमंचावर दिसणार आहेत. आतापर्यत जिल्ह्यातील नृत्य क्षेत्राशी निगडित सर्व कलाकारांनी रंगभूमीची प्रामाणिकपणे केलेली सेवा आणि मनोरंजन याची दखल शासनमान्य संस्था चिमणी पाखरं डान्स अकॅडमी ने घेतली असून जास्तीत जास्त कलाकारांनी या नृत्य सन्मान सोहळ्यास उपस्थित राहून आपला सन्मान स्विकारावा असे आव्हान चिमणी पाखरं संस्थेचे अध्यक्ष श्री. रवी कुडाळकर आणि चिमणी पाखरं संस्थेचे सल्लागार श्री. सुनिल भोगटे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स