ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
लावण्यसिंधु व सिंधुरत्न फाउंडेशन तर्फे सौ. शितल सावंत यांचा सत्कार..

लावण्यसिंधु व सिंधुरत्न फाउंडेशन तर्फे सौ. शितल सावंत यांचा सत्कार..

प्रकाशन: 13 Mar 2024 03:13 PM
वाचन संख्या 221

कणकवली | प्रतिनिधी : कणकवली येथील लावण्यसिंधू लोककला व चित्रपट सहकारी संस्था आणि सिंधुरत्न फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी कणकवलीतील व्यावसायिक तथा खादी ग्रामोद्योगच्या व्हाईस चेअरमन सौ. शितल सावंत यांचा सत्कार चित्रपट अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर लावण्यसिंधू संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर, संचालिका सौ. प्रांजल पराडकर, श्री संतोष सावंत, सौ. रोझा खडपक्रर, सौ. रिया सांगेलकर उपस्थित होत्या.महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या कणकवली पोलिस स्टेशन येथील समुपदेशक सौ. रोजा अभय खडपकर व सौ. रिया सांगेलकर यांनी उपस्थित महिलांना कौटुंबिक तंटे स्मुपदेशाद्वारे कसे सोडविले जातात याबाबत मार्गदर्शन केले.अनेक वर्षे खडतर मेहनत घेऊन मराठी चित्रपट अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या सौ. अक्षता कांबळी यांच्या हस्ते आपला सत्कार होत असल्याचा आनंद असल्याचे सौ. सावंत यांनी सांगितले.

सौ. खडपकर व सौ. सांगेलकर यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना संस्थेतर्फे सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सौ. प्रांजल पराडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स