ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सतीश मुणगेकर राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

सतीश मुणगेकर राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

प्रकाशन: 13 Mar 2024 02:51 PM
वाचन संख्या 134

मसुरे | प्रतिनिधी : ‘नवी दिशा नवे उपक्रम’ या राज्यस्तरीय समूहातर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक सोहळा राजीव गांधी ई – लर्निंग स्कूल पुणे येथे पार पडला. या सोहळ्यामध्ये एकशे तीन उपक्रमशील शिक्षकांना गौरविण्यात आले. तसेच त्यांनी सादर केलेल्या विविध नवोपक्रमांच्या ‘शतक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले.यावेळी गुहागर तालुक्यातील जि. प. पू .प्राथ. आदर्श केंद्र शाळा चिखली नं.१ शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. सतिश पांडुरंग मुणगेकर यांनाउपसंचालक SCERT पुणे डॉ. शोभा खंदारे यांच्या हस्ते राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुणगेकर यांचा ‘खेळातून शिक्षण’ हा उपक्रम या पुस्तकात समाविष्ट आहे.

या कार्यक्रमास उपशासकीय अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे मनपाश्रीम. शुभांगी चव्हाण- या अध्यक्षस्थानी होत्या.तर माजी उपमहापौर महानगरपालिका पुणे आबा बागूल हे प्रमुख पाहुणे होते. तसेच SCERTचे अध्यक्ष राहुल रेखावार, उपसंचालक मा. डॉ .शोभा खंदारे आणि श्री. माणिक देवकर क्रीडा विभाग प्रमुख शिक्षण विभाग पुणे मनपा हे उपस्थित होते. ‌संपादक श्री. देवराव चव्हाण, श्री.बळीराम जाधव आणि श्री‌.आयुब शेख यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. पुरस्काराबद्दल सतीश मुणगेकर यांचे अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स