ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना विषबाधा व्हायला जबाबदार असणार्यांवर कठोर कारवाई करण्याची ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनची मागणी.

नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना विषबाधा व्हायला जबाबदार असणार्यांवर कठोर कारवाई करण्याची ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनची मागणी.

प्रकाशन: 11 Mar 2024 11:53 PM
वाचन संख्या 223

जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे आणि सावंतवाडी पोलिस यांना दिले निवेदन.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली इथल्या नवोदय विद्यालयातील विद्यार्थी विषबाधा प्रकरणाची ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन यांनी गंभीर दखल घेतली आहे. या विषबाधा प्रकारतील जबाबदार असणार्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन यांच्या वतीने कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या सह जिल्हा सचिव अर्जुन परब, जिल्हा महिला संघटक सौ. शिवानी पाटकर, सावंतवाडी तालुका सचिव ॲड. संदीप चांदेकर, देवगड तालुका सदस्य राज खडपे व इतर पदाधिकारी सदस्य यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग श्री. किशोर तावडे आणि सावंतवाडी पोलिस ठाण्याचे एपिआय श्री. इंगवले यांच्याकडे, ११ मार्चला लेखी निवेदन देत केली.

या निवेदनाद्वारे नवोदय विद्यालय सांगेली येथे विद्यार्थ्यांच्या शारिरीक, मानसीक व शैक्षणिक वाटचालीसाठी प्रतिकूल वातावरण असल्याचा आरोप ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन, सिंधुदुर्ग यांनी अनेक पालकांशी चर्चा व तक्रारींनंतर हे निवेदन देताना या सर्व प्रकाराला विद्यालयाचे प्राचार्य एम के जगदीश यांचे निलंबन व ठेकेदारावर गुन्हा दाखल करायची मागणी केली आहे. या सर्व कार्यवाहीचा अहवाल पंधरा दिवसात ह्यूमनराईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनकडे सादर व्हावा अन्यथा याची न्यायालयीन दाद मागितली जाईल असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सन्माननीय जिल्हाधिकारी व सावंतवाडी पोलिस यांनी या विषयी योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही दिली असल्याची माहिती ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन यांच्यावतीने कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी दिली. घडलेला प्रकार हा विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या शैक्षणिक मनोधैर्याचे देखील खच्चीकरण करत असून तो अत्यंत संवेदनशील आहे असेही ते म्हणाले.

यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा सचिव अर्जुन परब, जिल्हा महिला संघटक सौ. शिवानी पाटकर, सावंतवाडी तालुकाकोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव सुधीर पराडकर, सदस्य सौ. मेघना साळगावकर, श्री. कृष्णा गवस, देवगड तालुका सदस्य राज खडपे, सांगली नवोदय विद्यालयाचे पीटीसी मेंबर लक्ष्मण कदम उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स