ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शांताराम उर्फ बाळा गोसावी यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शांताराम उर्फ बाळा गोसावी यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड.

प्रकाशन: 11 Mar 2024 06:18 PM
वाचन संख्या 115

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गावचे सुपुत्र श्री शांताराम उर्फ बाळा गोसावी यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड नुकतीच करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी पत्र भाजप भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष श्री राहुल गोविंदराव केंद्रे यांनी श्री बाळा गोसावी यांना दिले आहे.

श्री शांताराम उर्फ बाळा गोसावी हे मसुरे गावचे सुपुत्र असून अनेक शासकीय योजनांचा तसेच शासकीय कारभाराचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. कैलासवासी नारायण शांताराम गोसावी चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी सामाजिक, कला, क्रीडा, आरोग्य क्षेत्रात मोठे काम केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अगदी तळागाळातील लोकांपर्यंत त्यांची नाळ जोडलेली आहे. गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाच्या भटके विमुक्त आघाडी या सेलच्या मालवण तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा प्रभारी म्हणून काम करताना त्यांनी या पदाला योग्य तो न्याय दिलेला आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांनी या सेलच्या माध्यमातून अनेक लोकांच्या गाठीभेटी घेऊन विविध विकासात्मक प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या वरिष्ठ पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे सर्व वरिष्ठ नेतेमंडळी यांच्याकडे पाठपुरावा करून अनेक प्रश्न सोडविले आहेत. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रांतिक सदस्य भारतीय जनता पार्टी श्री दत्ता सामंत, भारतीय जनता पक्ष भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांचे आभार श्री बाळा गोसावी यांनी मानले आहेत.

यावेळी बोलताना श्री बाळा गोसावी म्हणालेत की भाजप भटके विमुक्त आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष नंबर एकचा पक्ष बनवण्यासाठी आपण सर्व ते योगदान देणार आहे. मला मिळालेले हे पद भारतीय जनता पक्षाच्या तसेच भाजप भटके विमुक्त आघाडीच्या सर्व कार्यकर्ते, सदस्य, पदाधिकारी यांचे असून सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण योग्य ते काम करणार आहोत.

त्यांच्या या निवडीबद्दल भारतीय जनता पक्षाचे कल्याण डोंबिवली चे युवा भाजपा नेते नंदू दादा परब, माजी जि प अध्यक्ष सरोज परब, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, महेश बागवे, विलास मेस्त्री, जितेंद्र परब, संतोष पालव, बाबू आंगणे, दीपक पाटकर, नाना सामंत, महेश परब, बाळा सामंत, प्रथमेश निकम, सुधाकर बिरमोळे, नरेश आंगणे, सतीश आंगणे, अशोक बागवे आणि नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सदस्य, मसुरे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स