आंबेरीतील श्री देव जैन सकलेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रोत्सव २०२४ चे आयोजन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या गांवातील श्री देव जैन सकलेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रोत्सव २०२४ अंतर्गत, ८ मार्चला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
८ मार्चला सकाळी ८ वाजता श्री गणपती पूजन व लघुरुद्र, सकाळी १० वाजता जैन सकलेश्वर देवाची पूजा, १०:३० वाजता ग्रामस्थ भाविकांचा एकादशणी अभिषेक, १२ वाजता आरती, दुपारी १ वाजता वरद शंकर पूजा असे धार्मिक विधी संपन्न होतील. त्यानंतर श्री अक्षय परब ( मुंबई ) आणि श्री रवी परब ( उपसरपंच, ग्रामपंचायत) पुरस्कृत शालेय मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता सुस्वर भजने सादर केली जाणार असून रात्री ८ वाजता श्री बाळा सावंत दशावतार नाट्यमंडळ नेरूर, असरोंडी यांचा अमृतगंगा हा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. ८ मार्चला या सर्व विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव जैन सकलेश्वर मंदिर, येथील महाशिवरात्रोत्सव आयोजक ग्रामस्थांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)