मालवण धुरीवाडा येथील श्री अरविंद तथा अरु धुरी कालवश.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या धुरीवाडा येथील श्री अरविंद धुरी यांचे ४ मार्चला सायंकाळी उशीरा अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या, भाऊ, भावजया असा परीवार आहे. रिक्षा व्यावसायिक शरद धुरी, धुरीवाडा येथील पिठ गिरण व्यावसायिक सुनिल धुरी यांचे ते बंधु होत.
मालवण शहरातील सुप्रसिद्ध अशा खंडाळेकर वृत्तपत्र सेवेच्या माध्यमातून गेली ३५ वर्षे अत्यंत हसतमुखाने आणि जबाबदारीपूर्वक फिरती वृत्तपत्र विक्री करणार्या अरविंद धुरी यांच्या निधनानंतर मालवण शहरातून शोक व्यक्त होत आहे. उद्या ५ मार्चला सकाळी धुरीवाडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने दिली गेली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)