ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सा. बां. धकाम विभागातर्फे देवगड न्यायालयाच्या कोनशीला समारंभाच्या उदघाटन प्रसंगाची जय्यत तयारी ; देवगडच्या सौंदर्यांत भर पाडणारी वास्तू ठरण्याचे संकेत.

सा. बां. धकाम विभागातर्फे देवगड न्यायालयाच्या कोनशीला समारंभाच्या उदघाटन प्रसंगाची जय्यत तयारी ; देवगडच्या सौंदर्यांत भर पाडणारी वास्तू ठरण्याचे संकेत.

प्रकाशन: 23 Feb 2024 07:56 PM
वाचन संख्या 88

शिरगांव | संतोष साळसकर : सार्वजनिक बांधकाम विभागतर्फे देवगड न्यायालयाच्या कोनशीला समारंभाच्या उदघाटन कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ४ हेलिपॅड व न्यायालयाकडे जाणा-या रस्त्यांची डागडुजी करुन परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. शासकिय विश्रामगृहाचे देखील सुशोभिकरण करण्यात आले आहे. देवगड तालुका दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशीला समारंभ उद्या २४ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली कोनशीला समारंभ संपन्न होणार आहे.

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय,पालकमंत्री रवींद्र चव्हाण, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून देवगड तालुका न्यायालयाच्या नूतन इमारतीचे देवगड तालुकावासीयांचे स्वप्न अनेक वर्षानंतर साकारत आहे. देवगड शहर पर्यटनाच्या नकाशावर झळकत असतानाच देवगड न्यायालयाची ही नवीन इमारत शहराच्या देखण्या स्थळांत भर घालणारी होणार आहे. वस्तू शास्त्राचा आदर्श नमुना म्हणून या इमारतीकडे पाहिले जाईल. सार्वजनिक बांधकाम कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी अधीक्षक अभियंता छाया नाईक , मुख्य अभियंता राजभोज यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुका न्यायालय इमारतीचा सर्वांगसुंदर आराखडा बनवून घेतला आहे . सार्वजनिक बांधकामच्या माध्यमातून तब्बल २८.२१ कोटी निधी खर्चून चार मजली सुबक अशी देवगड न्यायालयाची ही इमारत उभी राहणार आहे. ज्यूडीशीअल ऑफिस,जज चेंबर, कोर्ट हॉल, कॉन्फरन्स हॉल, लोकअदालत हॉल, कोर्ट चेंबर, चेंबर आदी सह अन्य सुविधा या नूतन इमारती मध्ये असणार आहेत. एकंदरीत देवगड शहराच्या पर्यटन दृष्ट्या विकासात भर घालतानाच देवगड तालुकवासीयांच्या अपेक्षा पूर्तीचा बिंदू देवगड तालुका न्यायालयाची इमारत ठरेल.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स