ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात २५ फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा उत्सव.

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात २५ फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा उत्सव.

प्रकाशन: 24 Feb 2024 12:19 AM
वाचन संख्या 52

मसुरे | प्रतिनिधी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने रविवार २५ फेब्रुवारीला माघ वद्य प्रतिपदा ‘गुरुप्रतिपदा ‘ उत्सव वटवृक्ष मंदिरात साजरा होत आहे. गुरुप्रतिपदेनिमित्त पहाटे ५ वाजता पुरोहित मोहन गुरुजी व मंदार महाराजांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींची काकड आरती संपन्न होईल. यानंतर मंदिर स्वामी भक्तांकरीता दर्शनास खुले करण्यात येईल. गुरुप्रतिपदे निमित्त जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना श्रीफळ, खडीसाखर प्रसाद देणेत येईल. त्यानंतर सकाळी ०८:३० वाजता ज्योतिबा मंडपात मंदार महाराज पुजारी व ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात देवस्थानचे लघुरुद्र अभिषेक होईल. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीच्या वतीने सोय करण्यात आली असून गर्दीमध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरिता पोलीस बंदोबस्ताचीही मागणी करण्यात आली आहे. दुपारी ११:३० वाजता नैवेद्य आरती नंतर देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानकडून सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री ०९:३० या वेळेत अक्कलकोट शहरातून भजन, दिंड्यांसह सवाद्य पालखी सोहळा संपन्न होईल. हा पालखी सोहळा वटवृक्ष मंदिरातून फत्तेसिंह चौक, मेन रोड, कारंजा चौक, समाधी मठ, परतीचा मार्ग बुधवार पेठ, कारंजा चौक मार्गे, मौलाली गल्ली, सुभाष गल्ली, गुरु मंदिर, भारत गल्ली, स्वामी गल्ली मार्गे रात्री साडे नऊ वाजता पालखी सोहळा वटवृक्ष मंदिरात येईल. वटवृक्ष मंदिरात पालखी सोहळा आल्यानंतर गुरु भजन होवून देवस्थानकडून उपस्थित सर्व भाविकांना शिरा प्रसाद वाटप करणेत येऊन गुरु प्रतिपदा उत्सवाचा सांगता समारंभ होईल. तरी सर्व भाविकांनी श्रींच्या व पालखी सोहळा दर्शनाचा, सेवेचा, व भोजन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स