ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
नांदगांव तिठा उड्डाणपुलाखालील कार्यक्रमांबाबत ज्येष्ठ नागरीक श्री. सुरेश मोरये यांचे जिल्हा पोलिस अधिक्षक यांना पत्र ; ११२ क्रमांकावर सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची व्यक्त केली खंत.

नांदगांव तिठा उड्डाणपुलाखालील कार्यक्रमांबाबत ज्येष्ठ नागरीक श्री. सुरेश मोरये यांचे जिल्हा पोलिस अधिक्षक यांना पत्र ; ११२ क्रमांकावर सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची व्यक्त केली खंत.

प्रकाशन: 20 Feb 2024 03:55 PM
वाचन संख्या 240

महामार्गावरील मोकळ्या जागा खुले रंगमंच म्हणून जाहीर करावेत व आमचे दुसर्या जागी पुनर्वसन करावे अशीही श्री. सुरेश अर्जुन मोरये यांनी केली विनंती.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या नांदगांव येथील ज्येष्ठ नागरीक सुरेश अर्जुन मोरये यांनी पोलिस अधिक्षक, सिंधुदुर्ग यांना लेखी पत्राद्वारे नांदगांव तिठा येथील मुंबई गोवा महामार्गावरील चौकात होणार्या सामाजिक, धार्मिक, वैयक्तिक, संघटनात्मक व राजकीय कार्यक्रमांदरम्यान होत असलेल्या ध्वनीप्रदूषणाबाबत पत्राद्वारे लेखी तक्रार केली आहे. कणकवली पोलिस स्टेशनलाही त्यांनी तसे सूचीत केले आहे. १९ फेब्रुवारीला त्यांनी सदर पत्र दिले.

या कार्यक्रमांदरम्यान दिवस रात्र वाजणार्या ध्वनीक्षेपकाचा तथा लाऊडस्पीकरचा ज्येष्ठ नागरीक श्री. सुरेश मोरये व त्यांच्या पत्नी सौ. मोरये, यांना भयानक त्रास होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. महामार्गावरच्या उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत खरेच असे उपक्रम व कार्यक्रम करायचे असतील तर आपले दुसर्या जागी पुनर्वसन करावे अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स