सिंधुरत्न फाऊंडेशनच्या वतीने शिवजयंती साजरी.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कलमठ बँक कॉलनी येथे सिंधुरत्न फाऊंडेशन अध्यक्ष अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी आपल्या महिलांसह शिवजयंती साजरी केली. यावेळी सौ वैशाली नाईक, सौ पाटील, सौ लक्ष्मी गवस , डॉ सौ निता रावण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार घालून छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी उपस्थित महिलांशी महाराजांच्या विचारांची देवाण घेवाण केली.
शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. जनकल्याणासाठी व युद्ध हे त्यांचे साधन होते. त्यांनी अनेक गनिमेकावे केलं पण ते फक्त हिंदवी स्वराज्यासाठीच केले आणि म्हणूनच त्यांची पूजा केली जाते. यावेळी सौ लक्ष्मी गवस , डॉ सौ नीता रावण, सौ वैशाली नाईक, सौ पाटील, जान्हवी रावण, अर्चना राणे, सौ साक्षी आमडोस्कर, डॉ जयवंत रावण, अर्णव रावण, सिद्धेश कांबळी, अनुज कांबळी, कांबळी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)