ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजने अंतर्गत नागरी बँकांचा समावेश करावा ; ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांची मागणी.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजने अंतर्गत नागरी बँकांचा समावेश करावा ; ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांची मागणी.

प्रकाशन: 18 Feb 2024 03:27 PM
वाचन संख्या 90

तरेळे | निकेत पावसकर : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्यावतीने विविध कर्ज योजना, व्याज परतावा योजना, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी सुरू आहेत. या योजनांचा फायदा मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकाची आवश्यकता आहे. मात्र, अनेक अडचणींमुळे राष्ट्रीयकृत बँकेत अशी कर्ज प्रकरणे मंजूर होत नाहीत. त्यामुळे या योजनांचा लाभ मिळण्यासाठी यामध्ये नागरी सहकारी बँकांचा समावेश करावा, अशी मागणी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे व अमोल गावडे यांनी केली आहे.

या महामंडळाकडून विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांसाठी व नवीन उद्योजक यासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडूनच कर्ज घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतले तरच या व्याज परतावा योजनेचा फायदा नागरिकांना होतो. परंतु राष्ट्रीय बँकेकडून बेरोजगार युवकांची कर्ज प्रकरणे मंजूर केली जात नाहीत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक व नवउद्योजक या लाभापासून वंचित राहतो या योजनेचा सर्वच नवउद्योजकांना लाभ मिळवण्यासाठी यामध्ये नागरी सहकारी बँकांचा समावेश करावा अशीही मागणी करण्यात आली आहे.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळास प्रतिवर्षी भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो. परंतु तो निधी सर्वसामान्य नागरिकांना भटक्या व जमातींना त्याचा लाभ मिळत नसल्याने तो निधी प्रतिवर्षी परत जातो. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळांमधील असलेला धनगर समाज व इतर भटक्या जमाती गेली ७५ वर्षे पूर्ण होऊनही समाजात त्याचा लाभ झाला नाही. तरी तो होणं खूप गरजेचे आहे .विविध जाती जमातीसाठी महामंडळ निर्माण केली असून परंतु खऱ्या अर्थाने जेवढी आश्वासने दिली आहेत, तेवढी प्रकरणे मंजूर करण्यात येत नाहीत व अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांचे प्रमाण वाढत असल्यामुळे नोकरीचासुद्धा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात गंभीर आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ज्या काही विविध जाती जमातीची युवा उद्योजकांच्या बाबतीमध्ये ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्या योजनेच्या बाबत राष्ट्रीय बँकांमध्ये अडवणूक केली जाते. त्यामुळे नागरिक सहकारी बँकांचा समावेश करून नवउद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी संधी निधी उपलब्ध होतील व बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल, अशी .आगणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स