मालोंड गावी श्री. देवी सती आई वार्षिक जत्रोत्सव ; विविध कार्यक्रमांचे आयोजन
तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मालोंड गावातील श्री. देवी सती आईचा, वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दिनांक २०फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत ते पुढीलप्रमाणे. दि.२०/२/२४ -मालोंड गावातील कुलदैवतांचे व ग्राम देवीदेवतांचे दिवसभर मानपान व निमंत्रण- दि.२१/२/२४ रोजी संध्याकाळी- जोगवा व रात्री गोंधळ . दि. २२/२/२४ रोजी सकाळी. ८ ते १२:३० कळस पूजन व श्रीदेवी सतीआई मंदिरावर कळसाची संपूर्ण पूजा विधी करून स्थापना. दिनांक २३/२/२४ रोजी श्री.देवी सतीआईचा वार्षिक जत्रोत्सव. अंभ्यंगस्नान, अभिषेक, होमहवन, सत्यनारायण महापूजा,आरती,प्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी हळदीकुंकू, रात्री सुस्वरभजन, पालखी सोहळा, दशावतारी नाटक – इ.कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेनुसार सादर केले जातील. दि. २४ सांगता समारंभ असून सर्व प्रभुकुल विस्तार बंधू भगिनींनी आणि गावातील भक्तगण यांनी उपस्थित राहून कळस दर्शन आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे प्रभुकुल विस्तार संस्था अध्यक्ष पांडुरंग मालाडकर आणि सरचिटणीस सदा मालाडकर यांनी सर्वांना आवाहन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)