किल्ले सिंधुदुर्गवर आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा ; शिवराजेश्वर मंदिराच्या नुतनीकरणानंतर सोहळ्याचे प्रथम वर्ष.
मालवण | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव असलेले शिवराजेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून या शिवराजेश्वर मंदिराचे नूतनीकरण व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन सिंहासनाचे बांधकाम करण्यात आले असून नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. मंदिराच्या नुतनीकरणानंतर सिंधुदुर्ग किल्ला येथे शिवराजेश्वर मंदिरात प्रथमच शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुक काढत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते मूर्तीस जिरेटोप आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला. भगवे फेटे, भगवे झेंडे यामुळे किल्ले परिसर भगवामय झाला. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून उभारलेला भव्य भगवा ध्वज देखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
याप्रसंगी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शिवसेना उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी बाबी जोगी, प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, उपतालुका प्रमुख सन्मेष परब, वायरी सरपंच भगवान लुडबे, महिला आघाडी शहराध्यक्ष दीपा शिंदे, मनोज मोंडकर, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगूत, उपतालुका प्रमुख उमेश मांजरेकर, भाई कासवकर, ज्येष्ठ शिवसैनिक व पदाधिकारी यशवंत गावकर,हेमंत मोंडकर, वायरी ग्रा. प. सदस्य सौ. प्रभू, युवतीसेना तालुका प्रमुख नीनाक्षी मेथर, युवती सेना आचरा विभाग प्रमुख आर्या गावकर, सोशल मिडिया शहर प्रमुख सिद्धेश मांजरेकर, किशोर गावकर, पदाधिकारी अक्षय भोसले यांच्यासह असंख्य शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)