चाफेड गावठण प्रशालेत श्रुतिका लाड यांची मानधन तत्वावर स्वयंसेविका म्हणून नियुक्ती.
शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या चाफेड गावठण येथील प्राथमिक शाळेत श्रुतिका विजयकुमार लाड यांची तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर स्वयंसेविका म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. चाफेड गावठण येथे १ ली ते ७ वी पर्यंत शाळा असून याठिकाणी सध्या मुख्याध्यापक आणि एक शिक्षक कार्यरत आहेत. या दोन शिक्षकांवर शैक्षिणक दृष्ट्या खूपच अतिरिक्त भार होत होता. त्यामुळे मुलांचे शैक्षिणक दृष्ट्या खूप नुकसान होत होते. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन मोंडकर आणि मुख्याध्यापिका सौ. गौरी नारकर यांनी शाळा व्यवस्थापन समिती यांच्या लेखी ठरावानुसार गटशिक्षणाधिकारी यांच्या लेखी आदेशानुसार डीएड/ बीएड धारक श्रुतिका विजयकुमार लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सरपंच किरण मेस्त्री आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी गटशिक्षणाधिकारी श्री श्रीरंग काळे यांचे विशेष आभार मानले.
श्रुतिका लाड यांचे सरपंच किरण मेस्त्री, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन मोंडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. गौरी नारकर, शिक्षक विकास वाडीकर, माजी सरपंच आकाश राणे, हर्षद राणे, बंटी राणे आदीसह महिला सदस्या उपस्थित होत्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)