ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मिठबाव येथे १३ रोजी तिरंगी भजनबारी सामना.

मिठबाव येथे १३ रोजी तिरंगी भजनबारी सामना.

प्रकाशन: 13 Feb 2024 10:51 AM
वाचन संख्या 69

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मिठबाव उत्कटवाडी येथील श्री देव गणपती देवस्थान येथे १३ फेब्रुवारी रोजी माघी श्री गणेश जयंती उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये आज रात्री ९.३० वाजता तिरंगी भजन बारीचा सामना आयोजित करण्यात आला आहे. श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ वर्दे तालुका कुडाळचे बुवा विजय उर्फ गुंडू सावंत विरुद्ध श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ भरणी तालुका कुडाळचे बुवा श्री विनोद चव्हाण, विरुद्ध तासलेदेव प्रासादिक भजन मंडळ मालवण मसुरे बुवा श्री संजय गावडे या तीन भजनी बुवांमध्ये हा तिरंगीभजन बारीचा सामना होणार आहे. बुवा विजय सावंत यांना पखवाज साथ विराज बावकर तर तबला श्रावण आंबेरकर, बुवा विनोद चव्हाण यांना पखवाज साथ तुषार लोट, तबला शिवराज पोईपकर आणि बुवा संजय गावडे यांना पखवाज साई गावडे, तबला ओंकार थवी हे साथ करणार आहेत. उपस्थितीचे आवाहन श्री देव गणपती देवस्थान उत्कटवाडी मिठबाव यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स