चाफेड येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप पाटील कालवश.
शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या चाफेड पिंपळवाडी येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप दाजी पाटील (५५ ) यांचे शुक्र. दि. ९ फेब्रुवारीला पहाटे ५ वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिण, भावजय, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे. माजी ग्रामपंचायत सदस्या दिप्ती पाटील यांचे ते पती होत.
दिलीप पाटील यांचा गावच्या, वाडीच्या विकासकामात खूप मोठा सहभाग असायचा. तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी भांडण तंट्यात प्रत्येकाला योग्य न्याय देण्याचे चांगले काम केले. गावच्या समाजकार्यात आणि विकासकामात त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांच्या निधनाने, सर्वांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व हरपल्याची प्रतिक्रिया चाफेड सरपंच किरण मेस्त्री यांनी दिली. त्यांच्या अकाली निधनाने चाफेडमधून शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)