बेंगळुरु येथील 'एक्स्पोजर व्हिजीट आऊटसाईड स्टेट' साठी आचरा पिरावाडी शाळेचा कु. मृणाल विठ्ठल धुरी आणि मसुरे देऊळवाडा शाळेची कु. यशश्री गुरुनाथ ताम्हणकर यांची मालवण तालुक्यातून निवड.
मालवण | सुयोग पंडित : समग्र शिक्षा अंतर्गत राज्य शासनाच्या राष्ट्रीय अविष्कार अभियान २०२३/२४ उपक्रमा अंतर्गत अंतर्गत ‘एक्स्पोजर व्हिजीट आऊटसाईड स्टेट’ साठी आचरा पिरावाडी शाळेच्या कु. मृणाल विठ्ठल धुरी आणि मसुरे देऊळवाडा शाळेच्या कु. यशश्री गुरुनाथ ताम्हणकर यांची मालवण तालुक्यातून निवड झाली आहे. बेंगळुरु येथे २० जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान ही विशेष सहल संपन्न होईल. सर्वात प्रगत शाळांमधील अध्ययन निष्पत्ती उत्तम असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना राज्याबाहेर जाऊन अभ्यास करायच्या संधीसाठी प्रोत्साहन व बक्षिस म्हणून ही निवड करण्यात येते.
आचरा पिरावाडी शाळेच्या कु. मृणाल विठ्ठल धुरी आणि मसुरे देऊळवाडा शाळेच्या कु. यशश्री गुरुनाथ ताम्हणकर यांचे तसेच त्यांच्या प्रशाल व शिक्षक यांचे मालवण तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)