ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
ओरोस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नाविन्यपूर्ण ऑक्सिजन प्लांट प्रशिक्षण उपक्रम ....!

ओरोस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नाविन्यपूर्ण ऑक्सिजन प्लांट प्रशिक्षण उपक्रम ....!

प्रकाशन: 15 Oct 2021 01:24 PM
वाचन संख्या 43

कोविड काळात भासणार्या ऑक्सिजनच्या कमतरतेसाठी महत्वाचे पाऊल…

ओरोस | प्रतिनिधी :आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोविड-19 साथीच्या रोगाशी उभ्दवलेल्या परिस्थितीत Oxygen Plant या क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा  याकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम प्रशिक्षण देण्याकरिता ऑक्सिजन प्लांट या क्षेत्रात जिल्ह्यातील 30 उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण  देण्यांत येणार आहे. हे प्रशिक्षण जिल्हा सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग येथे होणार आहे.

        उमेदवार आयटीआय मधून NTC (ITI) NAC Passed in fitter,Welder, MMTM, RAC, Electrcian, Instrument Mechanic, Aocp, MNCP, IMCP ट्रेडमधून पास असणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षण 180 तासाचे असून 35 दिवस चालणार आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारानी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा अधिक माहिती साठी 9420740740,9403350689,02362-228835 या क्रमाकावर संपर्क साधावा. असे आवाहन शा. गि. पवार सहायक आयुक्त,  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स