जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन झाला साजरा..!
माजी राष्ट्रपती ए.पि.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा होतो वाचन प्रेरणा दिन…
ओरोस | प्रतिनिधी : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दूल कलाम यांच्या स्मृती सार्थ रितीने जतन करण्यासाठी 15 ऑक्टोबर हा त्यांच्या जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांच्या हस्ते झाले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनात डॉ. ए.पी.जे अब्दूल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके, शासकीय प्रकाशनाची पुस्तके, ग्रंथालयाने चालु वर्षी खरेदी केलेली नवीन पुस्तके, गाजलेल्या कथा, कादंबऱ्या आणि डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
वाचन प्रेरणा दिनानिमित्तचे ग्रंथप्रदर्शन दिनांक 21 ऑक्टोंबर http://localhost/news/public/uploads/2021 पर्यंत सार्वजनिक सुट्टी वगळता कार्यालयीन वेळेत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सर्वासाठी मोफत खुले राहिल. तरी वाचक, सभासद, सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सचिन हजारे जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले आहे.सोबत फोटा
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)