ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गोळवण शाळा क्र. १ येथे आरोग्य शिबिर संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गोळवण शाळा क्र. १ येथे आरोग्य शिबिर संपन्न.

प्रकाशन: 25 Jan 2024 12:31 AM
वाचन संख्या 98

मसुरे | प्रतिनिधी : ग्रामपंचायत गोळवण कुमामे डिकवल व शाळा व्यवस्थापन समिती गोळवण नं 1 च्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे डॉक्टर संदीप साळकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थी शिक्षक व पालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिराला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आरोग्य शिबिरात विद्यार्थी व पालक शिक्षक यांचे हिमोग्लोबिन तपासणी विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासणी ,विद्यार्थी पालक व शिक्षक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी सिस्टर वर्दम यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले तसेच किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी मुलींना व माता पालकांना ग्रामपंचायत गोळवण कुमामे डिकवल यांच्या वतीने सॅनीटरी पॅडचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेला सॅनी पॅड डिस्पोज मशीन देण्यात आली. यावेळी सरपंच श्री सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, माजी उपसरपंच साबाजी गावडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास परब ,उपाध्यक्ष ज्योती मसुरकर, ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता चिरमुले, केंद्रप्रमुख ज्युनिस गावीत,सिस्टर लोबो, आरोग्य कर्मचारी ,पालक, ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक संतोष पाताडे , सहकारी शिक्षक संजय परुळेकर, नम्रता पावसकर, संजय जाधव उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स