ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ओसरगांव प्रशालेत आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ.

ओसरगांव प्रशालेत आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ.

प्रकाशन: 19 Jan 2024 08:05 PM
वाचन संख्या 57

मसुरे | प्रतिनिधी : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४९९ शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये मुलींना स्व संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर उपक्रमाचे औचित्य साधून जि. प. पू. प्राथ. शाळा ओसरगाव क्र. १ या शाळेमध्ये ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्री. प्रदिपकुमार कुडाळकर तसेच जिल्हा शिक्षण विभाग कार्यक्रम समन्वयक श्रीम. स्मिता नलावडे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. किशोर कदम , बोर्डावे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सुरेश हरकुळकर ,श्री प्रविण नाईक (शिक्षणप्रेमी) आणि सदर प्रकल्पाचे कोकण विभाग प्रमुख, जिल्हा समन्वयक, जिल्हा प्रशिक्षक समन्वयक, तालुका समन्वयक तसेच श्रीम. राजश्री तांबे, श्रीम. शितल दळवी यांनी आभार प्रदर्शन केले प्रमीता तांबे यांनी सूत्रसंचलन केले तसेच जि. प. पू. प्राथ. शाळा कसाल बालमवाडी क्र.१ या शाळेतील शिक्षक वर्ग व विद्यार्थी वउपस्थित होते.

मुलींना आत्मरक्षणाचे धडे देणे, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुलींना संयम कौशल्यात पारंगत करणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व जागृती विकसित करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई ,राज्य प्रकल्प संचालक श्री प्रदीप कुमार डांगे तसेच शिक्षणाधिकारी श्री. प्रदिपकुमार कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स