ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवणात २२ जानेवारीला भव्य दीपोत्सव ; भाजपा नेते व मालवण - कुडाळ विधानसभा संयोजक श्री. निलेश राणे यांच्या संकल्पनेतून बंदर जेटी येथे ३० फूटाची भव्य राम प्रतिमा उभी करण्यात येणार..!

मालवणात २२ जानेवारीला भव्य दीपोत्सव ; भाजपा नेते व मालवण - कुडाळ विधानसभा संयोजक श्री. निलेश राणे यांच्या संकल्पनेतून बंदर जेटी येथे ३० फूटाची भव्य राम प्रतिमा उभी करण्यात येणार..!

प्रकाशन: 19 Jan 2024 08:36 PM
वाचन संख्या 79

२५००० इलेक्ट्रॉनिक दिव्यांची आकर्षक रोषणाई आणि सोडण्यात येणार्या २०० आकाशकंदिलांनी अनुभवता येणार प्रकाशाची अनोखी पर्वणी..!

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर बंदर जेटी येथे पौष शुल्क द्वादशी विक्रम संवत २०८० म्हणजेच सोमवारी, २२ जानेवारी २०२४ च्या शुभ दिनी अयोध्येत श्रीरामाच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. आपणही आपल्या परिसरातील मंदिरांमध्ये सकाळी ११ ते १ या काळात रामभक्त ना एकत्र करून १०८ वेळा जप करावा व सायंकाळी सात वाजता आपल्या घरा समोर ५ पणत्या लावून दीपप्रज्वलन करावे असे आवाहन देखिल धार्मिक प्रसन्नतेने करण्यात येत आहे.
याचेच औचित्य साधून माजी खासदार श्री. निलेश राणे (मालवण कुडाळ विधानसभा संयोजक) यांच्या संकल्पनेतून मालवण बंदर जेटी येथे तीस फूट उंच असणारी भव्य राम प्रतिमा उभी करण्यात येणार आहे.

सायंकाळी ७ वाजता श्री. निलेश राणे व मालवण शहरातील देवस्थान विश्वस्त यांच्या उपस्थिती मध्ये मालवण बंदर जेठी येते २५००० इलेक्ट्रॉनिक दिव्यांची आकर्षक रोषणाई टप्प्याटप्प्याने प्रज्वलित करून भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता २०० आकाश कंदील प्रज्वलित करून आकाशात सोडण्यात येणार आहेत. हा भव्य दिव्य दीपोत्सव साजरा करण्यासाठी सर्व मालवणवासीय मोठ्या संख्येने बंदर जेठी येथे उपस्थित राहावे अशी विनंती भारतीय जनता पार्टी मालवण तर्फे करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स