ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मळगांव इंग्लिश स्कूल येथे कराटे, कीक़ बॉक्सींग, बॉक्सींग, तायक्वांदो प्रशिक्षणाचा शुभारंभ.

मळगांव इंग्लिश स्कूल येथे कराटे, कीक़ बॉक्सींग, बॉक्सींग, तायक्वांदो प्रशिक्षणाचा शुभारंभ.

प्रकाशन: 08 Jan 2024 01:14 AM
वाचन संख्या 92

बांदा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मळगांव इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कराटे, कीक बॉक्सींग, बॉक्सींग, तायक्वांदो प्रशिक्षणाचे उद्घाटन नुकताचे संस्थेचे चेअरमन मा. श्री मनोहर राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला. मळगांव इंग्लिश स्कूल व परिसरातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे खेळ अवगत व्हावेत व अशा प्रकारच्या खेळामध्ये या परिसरातील विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर चमकावेत या उद्देशानेच आम्ही हे प्रशिक्षण आमच्या प्रशाळेत सुरू करीत आहोत असे मत उद्घाटन भाषणात बोलताना चेअरमन मनोहर राऊळ व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर मळगाव इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री एम. बी. फाले, पर्यवेक्षक श्री. एस व्ही कदम, क्रीडा शिक्षिका सौ. ए. जी.मोर्ये, मार्शल आर्ट ट्रेनर श्री. किरण देसाई, पत्रकार श्री संजय भाईप, श्री. राकेश परब आदी मान्यवर उपस्थित होते. मार्शल आर्ट ट्रेनर श्री. किरण देसाई यांनी विद्यार्थी व पालकांना कराटे,कीक बॉक्सींग, बॉक्सींग, तायक्वांदो या क्रिडा प्रकाराविषयी माहिती दिली. तसेच कराटे,कीक बॉक्सींग, बॉक्सींग, तायक्वांदो याचे थोडक्यात प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. मुख्याध्यापक श्री एम. बी. फाले, क्रीडा शिक्षिका सौ. ए. जी. मोर्ये, श्री. राकेश परब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मळगांव परिसरातील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स