ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
चाफेड-गावठण शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री सचिन मोंडकर बिनविरोध..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

चाफेड-गावठण शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री सचिन मोंडकर बिनविरोध..!

प्रकाशन: 14 Oct 2021 09:48 PM
वाचन संख्या 59

उपाध्यक्षपदी सुरेंद्र राणे यांची बिनविरोध निवड

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील चाफेड-गावठण येथील प्रशालेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सचिन मोतीराम मोंडकर यांची तर उपाध्यक्षपदी सुरेंद्र वसंत राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारणी अशी,अध्यक्ष-सचिन मोतीराम मोंडकर,उपाध्यक्ष-सुरेंद्र वसंत राणे,सचिव-हरिश्चंद्र कृष्णा सरमळकर(उच्चश्रेणी मुख्याध्यापक),सदस्य-सौ.प्रियांका प्रदीप घाडी, सौ.सलोनी सुरेंद्र राणे,सौ.सानिका सागर राणे,सौ.मानवी मंगेश राणे,सौ.सानवी सचिन मोंडकर,सौ.ज्योती दीपक राणे,महेश बाळा राणे(स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी),औदुंबर सुग्रीव माने(शिक्षक प्रतिनिधी),आनंद मनोहर मोंडकर,उदय बाळा राणे,प्रवीण दीपक राणे(शिक्षणतज्ञ),रिद्धीमा सचिन राणे(विद्यार्थी प्रतिनिधी),सोहम प्रदीप घाडी(विद्यार्थी प्रतिनिधी)आदिची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी सन२०१५-१६ ला शाळेचा हिरकमहोत्सव साजरा झाला त्याच्या जमा-खर्चाचा अंतिम हिशोब सर्व ग्रामस्थ,पालक यांना उच्चश्रेणी मुख्याध्यापक हरिश्चंद्र सरमळकर यांनी सविस्तर वाचून दाखविला.त्याला सर्वांनी सहमती दर्शविली.तसेच यंदाच्या शारदोत्सव कार्यक्रमाचाही हिशोब मुख्याध्यापक यांनी वाचून दाखविला. या प्रशालेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक हरिश्चंद्र सरमळकर यांना यंदा आदर्श शिक्षकपुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचेही सर्वांनी विशेष अभिनंदन केले.

यावेळी माजी सरपंच संतोष साळसकर,माजी सरपंच आकाश राणे,माजी अध्यक्ष प्रवीण राणे,प्रदीप घाडी,माजी सरपंच सौ.दीपाली घाडी,शिक्षक औदुंबर माने,सौ.गौरी नारकर आदींसह ग्रामस्थ,पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन उपशिक्षिक औदुंबर माने यांनी तर आभार उपशिक्षिका सौ.गौरी नारकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स