ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
नेरूर येथील श्री कलेश्वर विद्यामंदिर हायस्कूलचा हिरक महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न ; खास. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

नेरूर येथील श्री कलेश्वर विद्यामंदिर हायस्कूलचा हिरक महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न ; खास. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती

प्रकाशन: 31 Dec 2023 06:26 AM
वाचन संख्या 108

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : नेरूर ग्रामसेवा मंडळ मुंबई संचलित श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर हायस्कुलला ६० व्या वर्षपूर्ती निमित्त हिरक महोत्सव सोहळा खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी मान्यवर व शाळेसाठी सहकार्य केलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून ५ लाख रु निधीतून श्री कलेश्वर विद्यामंदिर हायस्कूलला संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तसेच खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून १० लाख रु. निधीतून नवीन वर्गखोली बांधण्यात आली. या दोन्ही कामांची उद्घाटने खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. यापुढेही हायस्कूलसाठी लागणारे सर्वोतपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी शिवसेना उपनेत्या जान्हवी सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, मुंबईचे माजी नगरसेवक कमलाकर नाईक, नेरूर विभाग प्रमुख शेखर गावडे, सरपंच भक्ती घाडी, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर, शालेय समिती अध्यक्ष प्रदीप नाईक, मुख्याध्यापक श्रीम. नाईक, ग्रा. पं. सदस्य गणेश गावडे, निकिता सडवेलकर, अरुणा चव्हाण, मंजुनाथ फडके, संतोष कुडाळकर,रोशनी नाईक, सुचिता नेरुरकर, समीर नाईक, प्रभाकर गावडे, रोहिदास चव्हाण, विजय लाड, नरेंद्र नाईक यांसह शिक्षक शिक्षकेत्तर कमर्चारी, आजी माजी विद्यार्थीं, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स