ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदिवडे येथील मूळ रहिवासी श्री. कृष्णकुमार प्रभू कालवश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदिवडे येथील मूळ रहिवासी श्री. कृष्णकुमार प्रभू कालवश.

प्रकाशन: 26 Dec 2023 09:34 PM
वाचन संख्या 237

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदिवडे येथील मूळ रहिवासी आणि सध्या कणकवली कलमठ येथे वास्तव्यास असणारे निवृत्त पोस्ट मास्तर तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णकुमार मारुती प्रभू (वय ७९) वर्षे यांचे रविवारी निधन झाले.
कृष्णकुमार प्रभू यांनी चाळीस वर्ष पोस्ट ऑफिस मध्ये सेवा केली होती. २००५ मध्ये पोस्ट मास्तर म्हणून कणकवली पोस्ट कार्यालयातून ते सेवानिवृत्त झाले होते . कबड्डी या खेळामध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले होते. त्या काळात त्यांनी व्यायाम शाळा सुद्धा काढून तरुणांना एक अनोखे दालन निर्माण करून दिले होते. कृष्णकुमार प्रभू यांनी पोस्टल युनियन संघटना सिंधुदुर्गचे पंधरा वर्षे अध्यक्ष पद तसेच बांदिवडे देवस्थान अध्यक्ष पद, नाम सप्ताह मंडळ बांदिवडे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते. अनेक समाज सेवा संघटनांमध्ये ते कार्यरत होते. बांदिवडे गावच्या विविध धार्मिक, कला, क्रीडा, सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता.

विविध विकासात्मक कामांचाही त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता सर्वांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगले वक्ते म्हणून ते प्रसिद्ध होते. मराठी,हिंदी, इंग्लिश या भाषांवर त्यांचे मोठे प्रभुत्व होते. धार्मिक आणि राजकीय या विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून युवा सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद प्रभू , भूषण प्रभू आणि कृषी पर्यवेक्षक प्राची सावंत यांचे ते वडील होत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स