गोळवणला भाजप नेते डॉ निलेश राणे यांच्या हस्ते उद्या २७ डिसेंबरला विविध विकास कामांचा शुभारंभ.!
मसुरे | झुंजार पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या गोळवण येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ २७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४:०० वा. भाजप नेते डॉ. निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत गोळवण रवळनाथ मंदिर घाटीमाथा ते घाडीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. – १०.०० लक्ष,जि. प. २० टक्के सेस अनुदान. गोळवण ग्रा.पं. ऑफिस ते गोळवण बौद्धवाडी (समतानगर) जोडरस्ता तयार करणे. – ४.०० लक्ष, जि. प. स्वनिधी. जि. प. शाळा गोळवण नं. २ इमारत दुरुस्ती करणे. – ३.०० लक्ष आदी कामांचा समावेश आहे.
या वेळी उपस्थितीचे आवाहन गोळवण- कुमामे- डिकवल सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा पं. सदस्य यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...