साळशी - नाईकवाडी येथे आज दत्त जयंती उत्सवाचे आयोजन.
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या साळशी – नाईकवाडी येथे आज मंगळवार २६ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे.यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दत्ताचे मूळस्थान ( निवई) या ठिकाणी अभिषेक, पूजा, आरती, गा-हाणे, नवस बोलणे – फेडणे, तीर्थप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच नाईकवाडी येथील दत्त मंदिरात सकाळी अभिषेक, दत्तमुर्ती पूजा, महाआरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी दत्त जन्म सोहळा, महाआरती, महाप्रसाद, व राञी सुस्वर भजनांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन.