ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दिल्लीत प्रजासत्ताक दिनाला 'वंदे भारतम्' कार्यक्रमात सिंधुदुर्गातील ५ मुली सादर करणार मराठी संस्कृतीचा अविष्कार ; भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी विद्यार्थिनींना  आर्थिक मदत करत दिल्या शुभेच्छा.

दिल्लीत प्रजासत्ताक दिनाला 'वंदे भारतम्' कार्यक्रमात सिंधुदुर्गातील ५ मुली सादर करणार मराठी संस्कृतीचा अविष्कार ; भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी विद्यार्थिनींना आर्थिक मदत करत दिल्या शुभेच्छा.

प्रकाशन: 23 Dec 2023 07:07 PM
वाचन संख्या 202

भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर , मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते मदत सुपूर्त.

मालवण | सुयोग पंडित : येत्या २६ जानेवारीला दिल्ली त दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येत असलेला प्रजासत्ताक दिन सोहळ्या निमित्त महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी लावणी या नृत्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५  विद्यार्थिनींची निवड झाली आहे. कु. करीना खराडे (मालवण), कु. ऋतुजा राणे (मालवण ), कु.समिता कुबल (मालवण), कु. ममता गावडे (वेंगुर्ला ), कु.सानिका केरकर (कुडाळ) यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झाली आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडवण्यासाठी वंदे भारतम् या कार्यक्रमात या विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.

२६जानेवारी रोजी कर्तव्य पथ दिल्ली येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुरमु व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.  या विद्यार्थिनींना दिल्ली येथे जाण्यासाठी माजी खासदार व भाजपा नेते निलेश राणे (मालवण कुडाळ विधानसभा संयोजक) यांनी आर्थिक मदत करून सहकार्य केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी विजय केनवडेकर (जिल्हा उपाध्यक्ष) , तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते मदत देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण, संतोष गावकर ,रवि घागरे ,पंकज गावडे, संकेत कुलकर्णी, संकेत हसोळकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स