ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वायंगणी येथील दत्त मंदिराचा कलशारोहण सोहळा उद्या २४ डिसेंबर पासून ; उद्योजक डॉ. दिपक परब यांच्या शुभ हस्ते होणार कलश पूजन.

वायंगणी येथील दत्त मंदिराचा कलशारोहण सोहळा उद्या २४ डिसेंबर पासून ; उद्योजक डॉ. दिपक परब यांच्या शुभ हस्ते होणार कलश पूजन.

प्रकाशन: 23 Dec 2023 06:44 PM
वाचन संख्या 167

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वायंगणी येथील श्री संत दादा महाराज यांच्या जीर्णोद्धार केलेल्या श्री दत्त मंदिराचा धार्मिक विधी, होमहवन, कलशारोहन दत्तयाग आणि श्री दत्त जयंती उत्सव उद्या २४ डिसेंबर ते २६ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. यावेळी उद्योजक डॉ. दिपक परब यांच्या हस्ते कलश पूजन केले जाणार आहे. तर कलशारोहण श्री. रामदास प्रभू यांच्या हस्ते होणार आहे. या उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्री दत्त आणि श्री संत दादा महाराज समाधीची नित्यपूजन, ९ वाजता होमहवन, धार्मिक विधी व कलश पूजन, दुपारी १२ वाजता श्री दत्त मंदिर कलशारोहण, दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता श्री संत दादा महाराज दिनदर्शिका प्रकाशन, श्री. सिताराम करमरकर यांच्या हस्ते श्री संत दादा महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारीत भक्ती लिलामृत भाग १,२,३, ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित लिखीत श्री संत दादा महाराजांच्या अध्यात्मिक प्रचितीवरील कादंबरी ‘कल्याण कटोरा’ व आरती संग्रह या पुस्तकांचे मोफत वाटप, श्री. मनिष साळगावकर यांचा सत्कार सोहळा, रात्री ७ वाजता भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री गुरुदेव दत्ताची आणि श्री संत दादा महाराज यांच्या समाधीची नित्यपूजन, १० वाजता दत्तयाग, भजन, आरती, धार्मिक विधी करण्यात येणार आहेत.

दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता स्थानिक भजने होणार असून मंगळवार दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता नित्यपूजा धार्मिक कार्यक्रम, दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता भिक्षाफेरी, १० वाजता गादीवर भिक्षा घेणे, १०:३० वाजता कीर्तन, १२ वाजता दत्त जन्म, रात्री १ वाजता पालखी अशाप्रकारे ३ दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाना उपस्थित रहावे असे आवाहन घाडीवाडी मित्रमंडळ वायंगणी व ओमसाई भजन मंडळ वायंगणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स