ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मुणगे सरपंचपदी सौ. अंजली सावंत यांची बिनविरोध निवड.

मुणगे सरपंचपदी सौ. अंजली सावंत यांची बिनविरोध निवड.

प्रकाशन: 23 Dec 2023 07:39 AM
वाचन संख्या 115

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे गांवच्या सरपंचपदी भाजपच्या सौ. अंजली अशोक सावंत यांची काल शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व सदस्यांनी मला बिनविरोध निवडून दिल्या बद्दल सर्वांचे आभार मानते. सर्वांच्या सहकार्यातून गावातील विकासकामे पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील असे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच सौ अंजली अशोक सावंत यांनी यावेळी केले.सरपंच पदासाठी अडीच- अडीच वर्षाचा कार्यकाल निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार भाजपच्या सौ साक्षी गुरव यांनी अडीच वर्षे पुर्ण झाल्यामुळे सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंच पदाचा प्रभारी कार्यभार उपसरपंच संजय घाडी यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

यावेळी प्रभारी सरपंच संजय घाडी, ग्रामपंचायत सदस्य धर्माजी आडकर, रविना मालाडकर, संजय घाडी, परिता नाटेकर , तसेच मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत, ग्रामसेवक श्री कुबल, भाजप जिल्हा कार्य. सदस्य संजय बांबुळकर, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते तथा यशस्विनी प्रतिष्ठान अध्यक्ष आनंद मालाडकर, अशोक सावंत, सुनील सावंत, अशोक सावंत, सुरबा सावंत,पोलीस पाटील सौ. साक्षी गोविंद सावंत, बोरकर आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स