ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती उत्सवाला पारंपारिक पद्धतीने दत्त जन्मोत्सव व पालखी सोहळ्याचे आयोजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती उत्सवाला पारंपारिक पद्धतीने दत्त जन्मोत्सव व पालखी सोहळ्याचे आयोजन.

प्रकाशन: 23 Dec 2023 07:32 AM
वाचन संख्या 105

नाताळ व शासकीय सुट्टया आणि नूतन वर्ष पर्वावर वटवृक्ष मंदिरात भाविकांची लागणार रीघ .

मसुरे | प्रतिनिधी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव २६ डिसेंबरला साजरा होत आहे. २३ डिसेंबर २०२३ ते मंगळवार दिनांक १ जानेवारी २०२४ अखेर शासकीय व नाताळाच्या सुट्टया, दत्त जयंती तसेच नूतन वर्षाचे पर्व इत्यादी मुहूर्तावर वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनाकरिता असंख्य भाविक स्वामींच्या दर्शन भेटीस येणार आहेत. वटवृक्ष मंदीरात स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणे करीता स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत. जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना श्रीफळ, प्रसाद मिळेल. दत्त जयंती निमित्त भांडूप, मुंबई, तळेहिप्परगा, भातंबरे, कोल्हापूर, सातारा, खर्डी, गांवखडी, पुणे, रत्नागिरी इत्यादी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांची भोजन प्रसादाची व निवासाची सोय मैंदर्गी रस्त्यावरील देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली आहे. दिनांक २६ डिसेंबरला श्री दत्त जयंती निमित्त देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दुपारी ४ ते ५:३० या वेळेत दत्तजन्म आख्यान वाचन, व भजन करून सायंकाळी ६ वाजता हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्म सोहळा व पाळणा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात संपन्न होईल.

दत्त जयंती रोजी भक्त निवास येथील भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद दुपारी १२ ते ३ यावेळी देण्यात येईल. बुधवार २७ डिसेंबर रोजी दुपारी ११:३० च्या नैवेद्य आरती नंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप करणेत येईल. सायंकाळी ५ ते रात्री ९:३० या वेळेत शहरातून श्रींचा पालखी सोहळा मिरवणूक भजन, दिंड्या व वाद्यांसह पार पडणार आहे. अक्कलकोट शहरातून या पालखी सोहळ्याचा मार्ग सालाबादप्रमाणे वटवृक्ष मंदिरातून फत्तेसिंह चौक, समर्थ चौक, सावरकर चौक, कारंजा चौक मार्गे समाधी मठ समाधी मठात पालखीचे पूजन, भजन होऊन कारंजा चौकमार्गे सुभाष गल्ली, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे रात्री ९:३० वाजता श्रींची पालखी मिरवणूक मंदिरात आल्यानंतर देवस्थानच्या वतीने शीरा प्रसाद वाटप होवून श्री दत्त जयंती उत्सवाचा सांगता समारंभ होईल.

जास्तीत जास्त भाविकांनी श्री दत्त जन्म सोहळा, पालखी सोहळ्यास उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा पालखी सोहळा दर्शनाचा कीर्तनसेवेचा व भोजन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स