ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
व्ही एन नाबर इंग्लिश मीडियम स्कूल बांदा च्या एम एस एफ सी (MSFC) विभागाची पडवे माजगाव येथील वनसंशोधन उपकेंद्राला क्षेत्रभेट.

व्ही एन नाबर इंग्लिश मीडियम स्कूल बांदा च्या एम एस एफ सी (MSFC) विभागाची पडवे माजगाव येथील वनसंशोधन उपकेंद्राला क्षेत्रभेट.

प्रकाशन: 23 Dec 2023 07:24 AM
वाचन संख्या 115

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील व्ही.एन.नाबर इंग्लिश मीडियम स्कूल च्या एम. एस. एफ. सी. विभागाची क्षेत्रभेट पडवे माजगाव येथील वनसंशोधन उपकेंद्रत नुकतीच नेण्यात आली. व्हि.एन.नाबर इंग्लिश मीडियम स्कूल, बांदा मधील शेती पशुपालन या विभागांमध्ये शेती विषयक प्रात्यक्षिक घेण्यात येतात. या विषयाचा एक भाग म्हणून ही क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. या क्षेत्रभेटीमध्ये विद्यार्थ्यानी विविध औषधी वनस्पतींचा अभ्यास केला. या वनस्पतीच्या लागवडीविषयी तसेच या वनस्पतींचा मनुष्याच्या कोणत्या आजारावर औषध म्हणून उपयोग होतो या संदर्भातील माहिती वनरक्षक सौ. दीप्ती मोर्ये त्यांच्याकडून घेतली.

जवळपास ३० ते ३५ विविध वनऔषधी वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांनी आत्मसात केली. तसेच या वनसंशोधन उपकेंद्रामधील विविध झाडांची माहिती त्यापासून मिळणाऱ्या फळांची, विविध उपयोग याची माहिती सुद्धा देण्यात आली. इयत्ता आठवी मधील १५ विद्यार्थ्यांनी या क्षेत्रभेटीमध्ये सहभाग घेतला होता.

या क्षेत्रभेटीमध्ये प्रशाळेच्या मुख्याध्यापीका सौ. मनाली देसाई, शेती विभागाच्या निदेशिका सौ. गायत्री देसाई, गृह आरोग्य विभागाच्या निदेशिका सौ. रिया देसाई, ऊर्जा पर्यावरण विभागाचे निदेशक श्री.भूषण सावंत, एफ. सी. विभागाचे समन्वयक तथा अभियांत्रिकी विभागाचे. निदेशक श्री राकेश परब यांनी सहभाग घेतला होता. या क्षेत्रभेटीसाठी श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट चे चेअरमन श्री. मंगेश कामत त्यांचे अनमोल सहकार्य लाभले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स