हडी येथे उद्या २४ डिसेंबरला नेत्र चिकित्सा व रक्त तपासणी शिबिर.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या हडी येथे उद्या २४ डिसेंबरला ‘फेस्कॉन संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडी व विवेकानंद नेत्रालय कणकवली’ यांच्या संयुक्त विद्यमाने संघाच्या वर्धापन दिनानिमित्त जठारवाडी शाळा क्र. २? येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत नेत्रचिकित्सा आणि रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन हडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)