मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय हँडबॉल स्पर्धेत गोगटे वाळके कॉलेज विजयी.
बांदा | राकेश परब : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे नुकत्याच झालेल्या मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन कोकण विभागीय हँडबॉल स्पर्धेत बांदा येथील गोगटे वाळके महाविद्यालयाने एस. पी. के. महाविद्यालयाचा पराभव करत कोकण विभागीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर विजेते पद प्राप्त केले. या संघात कप्तान कु. नेहा गवस, सीमा नाईक, वीणा आंबिये, निशा नाईक, वैभवी पेंडूरकर, शरीफा शेख, मंगल पाटील, तन्वी देसाई, सलोनी लांबर, आकांक्षा पंडित, वैष्णवी वेंगुर्लेकर आणि गोल कीपर गौरी तिरोडकर यांनी उत्तम खेळ केला.
या संघातील नऊ खेळाडूंची कोकण विभागीय संघामध्ये निवड झाली असून २२ डिसेंबर रोजी पनवेल येथे होणाऱ्या मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. विजयी संघाचे व निवड झालेल्या खेळाडूंचे शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष श्री. डी. बी. वारंग, सचिव श्री. एस. आर. सावंत, खजिनदार श्री. टी. एन. शेटकर, सर्व संस्था संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या संघाला क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. शरद शिरोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. सौ. रश्मी कजरेकर यांनी काम केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)