ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
आमदार वैभव नाईक यांच्या हिवाळी अधिवेशनातील मुद्देसूद मांडणीची राजकीय तज्ञांकडून होत आहे प्रशंसा ; जिल्ह्यातील विविध समस्यांकडे तंत्रशुध्द पद्धतीने वेधले लक्ष.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आमदार वैभव नाईक यांच्या हिवाळी अधिवेशनातील मुद्देसूद मांडणीची राजकीय तज्ञांकडून होत आहे प्रशंसा ; जिल्ह्यातील विविध समस्यांकडे तंत्रशुध्द पद्धतीने वेधले लक्ष.

प्रकाशन: 21 Dec 2023 05:46 AM
वाचन संख्या 185

नागपूर | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्ताव मांडणीची व तंत्रशुध्द पद्धतीची सध्या राजकीय वर्तुळात आणि राज्यातील राजकीय तज्ञांकडून प्रशंसा होत आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावास आमदार वैभव नाईक यांनी पाठींबा देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आवाज उठविला. यामध्ये कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे प्रश्न, गांवागांवात मूलभूत सुविधांची झालेली वानवा, सुरक्षा रक्षक मंडळातील स्थानिक कर्मचाऱ्यांचे प्रश्न,कुडाळ महिला बाल रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, एमआरजीएस योजनेची उदासीनता, हवामान केंद्रांची आवश्यकता, पीक पाहणी मध्ये रखडलेल्या नोंदी याकडे सरकारचे लक्ष वेधले.

शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत जिल्हा नियोजन समिती मधून सरकारने केलेला खर्च त्यामुळे मूलभूत सुविधांची झालेली वानवा. कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे त्यांच्या सुरक्षेची हमी घेऊन अपघातप्रसंगी त्यांना सरकरकडून ठोस मदत करणे. कुडाळ महिला बाल रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, कायमस्वरूपी भुलतज्ञ नसणे तसेच कंत्राटी डॉक्टरांचे थकविलेले पगार याकडे आमदार वैभव नाईक यांनी लक्ष वेधले.

त्याचबरोबर सुरक्षा रक्षक मंडळातील स्थानिक कर्मचाऱ्यांना त्या त्या भागात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. त्यांना डावलण्यात येऊ नये.त्यांना ड्रेस कोड करावा. एमआरजीएस योजनेतील अटी शर्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेची अंमलबाजवणी होत नाही.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी या योजनेच्या निकषात बदल करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक हवामान केंद्रे बंद असल्याने शेतकरी आंबा काजू पीक विमा रक्कमेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे प्रत्येक मंडळात जास्तीत जास्त हवामान केंद्रे शासनाने द्यावीत. पीक पाहणी मध्ये नोंदी होत नाहीत त्यामुळे शासनाच्या योजनांपासून शेतकरी वंचित राहत आहेत याबाबत आमदार वैभव नाईक यांनी विशेष आवाज उठविला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स