ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुणगे हायस्कूल येथे क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ.

मुणगे हायस्कूल येथे क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ.

प्रकाशन: 20 Dec 2023 08:40 PM
वाचन संख्या 155

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल आणि कै. विणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ श्री भगवती एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक आबा पुजारे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देण्यात आली. तसेच हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज, क्रीडा शिक्षक एन जी वीरकर, सहाय्यक शिक्षक प्रसाद बागवे, हरीश महाले, सौ गौरी तवटे, प्रणय महाजन, गुरुप्रसाद मांजरेकर, स्वप्निल कांदळगावकर, सौ. मीताली हिर्लेकर, प्रियांका कासले, सुरेश नार्वेकर, मनोहर कडू आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स